नवापुर । निविदा निघूनही वर्कऑर्डर नसल्याने नवापूर-ते पिंपळनेर हा रहदारीचा रस्ता खड्ड्यातच अडकला असून वाहनधारकांची कसरत कायम आहे. त्यामुळे वाहनधारकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. दुसरीकडे 15 डिसेंबरपर्यंत रस्ते खड्डेमुक्तीचे आश्वासन हवेत उरल्याचे हे आणखी एक मोठे उदहारण समोर आले आहे. मोठा अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ या रस्त्याच्या दुरूस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनधारकांमधून जोर धरत आहे. दरम्यान, रस्त्याची डागडुगी करणे शक्य नसल्याने रस्ता पूर्णपणे नव्याने करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
समाज माध्यमांवर संताप
नवापूर ते पिंपळनेर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून प्रवासी व वाहन चालक या रस्त्यावरुन जातांना जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. रस्त्यावरुन जातांना खड्डयात रस्ते की रस्त्यात खड्डे असा प्रश्न पडला आहे. या रस्त्याचा अवस्थेकडे कोणाचेच लक्ष नसून अनेक तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांच्या नियोजनशुन्य कामामुळे रस्त्यावरील खड्डे कायम आहेत. अनेक वाहनधारकांनी सोशल मीडियावर या रस्त्याचे फोटो व्हायरल करून संताप व्यक्त केला आहे.
खड्ड्यांमुळे वापर टाळला
नवापूरपासुन चरणमाळ पर्यत रस्त्याची अत्यंत खराब असुन खड्डेमय रस्ता झाला आहे हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य नसल्याने कोणी ही या रस्त्यावरुन जात नाही. कधी काळी वाहतूक कमी असल्याने नाशिक जाण्यासाठी या रस्त्यावरुन जाणे पसंद केले जायचे पण रस्त्याच्या दयनिय अवस्थेमुहे येथुन प्रवास करणे वाहनधारक आता टाळत आहे. साक्री हद्दीतील रस्ता नव्याने तयार झाला मात्र नवापूर हद्दीतील रस्ते नव्याने दुरुस्ती झालेले नाही. खड्यामुळे रोज अपघात होऊन जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत असून अपघात घडण्राची शक्तरा वर्तविली जात आहे.
काटेरी झुडेप अपघाताला निमंत्रण
लक्ष देऊन कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी अशी जनतेची मागणी आहे वाहन चालक व प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी या रस्त्याचा कामाला प्राधान्याने सुरुवात झाली पाहीजे.तसेच या रस्त्याचा आजुबाजुला असलेली काटेरी झुडपे वाढली असून त्यांच्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. ही झुडपे काढून रस्ता मोकळा करावा, अशीही मागणी होत आहे. याच बरोबर तसेच रस्त्याचा आजुबाजुला साईट पट्ट्या असेण महत्त्वाच्या असून साईट पट्ट्या नसल्याने दुचाकी वाहनांना काही वेळा मोठी वाहन समोर आल्याने जागा मिळत नाही व अपघात होऊन अनर्थ घडु शकतो आणि असे अनेक वेळा झाले आहे.