वर्क फ्रॉम होमचे आदेश असतांना शिक्षकांना कोरोना रुग्ण सर्वेक्षणाचे काम

0

पुणे: एकीकडे राज्यशासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ चे आदेश दिले आहे. तर दुसरीकडे शिक्षकांना संशयित कोरोना रुग्ण शोधण्याचे काम देण्यात आले आहे. या शासनाच्या या दुहेरी भूमिकेबद्दल पदवीधर शिक्षक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. या स्थितीत संघटनेचा व शिक्षकांचा कामास विरोध नसून कामाच्या स्वरूपास विरोध असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

शिक्षण उपसंचालक पुणे तसेच प्राथमिक ,माध्यमिक शिक्षणाधिकारी पुणे व प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग पिंपरी चिंचवड मनपा यांच्या आदेशानुसार शिक्षकांनी 31मार्च पर्यंत घरीच थांबावे . शिक्षक इतरत्र फिरतांना आढळल्यास प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडून कारवाई करण्यात येईल, असे सक्त आदेश असतानांही शिक्षकांना संशयित कोरोना रुग्ण शोधणेकामी दिलेले सर्वेक्षणाचे काम या आदेशांच्या पूर्ण विसंगत आहे. शिवाय शिक्षकांना या सर्वेक्षणकामी कोणतेही संरक्षण व सुरक्षित किटही पुरवण्यात आलेले नाही वैद्यकीय विभागासारखे रुग्ण कसे हाताळावेत याचेही ज्ञान व प्रशिक्षण शिक्षकांना नाही त्यामुळे शिक्षक भयभीत झाले आहेत. अशी भूमिका पदवीधर शिक्षक संघटनेने मांडली आहे. शिक्षकांना याबाबत ‘होम फ्रॉम वर्क’ ची कामे असतील ती देण्यात यावीत. शिक्षक काम करायला तयार आहे. शालेय शिक्षण विभागातील आयुक्तांना या बाबत शिफारस करण्यात आली आहे.