अडावद । यावल-चोपडा रस्त्यावर आज पहाटे भरधाव ट्रक झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार झाला तर एक जखमी झाला. ही घटना वर्डी
फाट्यानजीक सकाळी 6 ते 6.30 वाजेच्या दरम्यान घडली. अखेर जेसीबीच्या साहाय्याने ट्रकची कँबीन तोडुन बाहेर काढण्यात यश आले.
अडावद पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल-चोपडा रस्त्यावर वाहनांचे स्पेअरपार्ट घेवुन जाणारा ट्रक क्र(जी.जे. 13 डब्लु 2900) हा भरधाव वेगाने चोपड्याकडुन
अडावदकडे येत असतांना सकाळी 6 ते 6-30 वाजेच्या सुमारास वर्डी फाट्यानजीक रस्त्याच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडाला जोरात धडकला. यात
क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला. घटनेची माहीत मिळताच सपोनि जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार रविंद्र साळी, अय्युब तडवी,
अकील खान, योगेश गोसावी घटनास्थळी धाव घेतली. जखमी ट्रकचालकार तात्काळ 108 रुग्णवाहीकेने उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.
याबाबत अडावद पोलीस ठाण्यात वर्डीचे पोलीस पाटील पदमाकर नाथ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अडावद पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल क
रण्यात आला आहे.