अमळनेर। विद्यार्थी हे देशाचे आधारस्तंभ आहेत देशसेवेसाठी विद्यार्थीनी उच्च शिक्षण घेवून कार्य करावे, असे आवाहन खा.ए.टी पाटील यांनी श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी केले. यावेळी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या शहर हगणदारीमुक्त झाले. म्हणून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना कृषिभूषण पाटील यांनी डीपीडीटी योजनेत निधी उपलब्ध करुन देवून तलावाचे सुशोभीकरण व दुरुस्ती करावी. यावेळी शिक्षण सभापती पोपट भोळे, तहसीलदार प्रदीप पाटील, माजी आमदार बी.एस.पाटील, कृउबा संचालक पावभा पाटील, पोलिस निरीक्षक विकास वाघ, उपप्राचार्य बर्हाटे सर, आनंदा कंखरे, ग्रामसेवक बी.एन.पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी भिकन वाडिले, भरत परदेशी, संजय शुल्क, जगन्नाथ पाटील, समाधान चौधरी यांनी परिश्रम घेतले.