निगडी:मानवी जीवन दुर्लभ आहे. त्यामुळे जीवनात नेहमी चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच यश, मान, सन्मान, संपत्ती मिळेल. मिळालेल्या संपत्तीचा गर्व करु नये. त्या संपत्तीतून घरात सुख, शांती, समाधान आले पाहिजे. त्याबरोबर गर्व, मद, मत्सर येता कामा नये. मनाच्या विरुध्द काही घडले तर असमाधानी होऊ नये. जीवनात सन्मान आणि अपमान अनेकदा मिळेल. परंतू सन्मानाचा गर्व करु नये, तर अपमानातून खचू नये, असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज यांनी केले. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्यावतीने पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मासानिमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले होते. त्यावेळी त्या उपस्थित बंधु-भगिनींना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.