** विकासकामे न करता निधीचा गैरवापर
साक्री । तालुक्यातील वर्धाने रेथील सरपंच आणि ग्रामसेवकाने ग्रामविकासासाठी मिळणार्रा निधीचा भ्रष्टाचार केल्राचा आरोप वर्धाणे रेथील नागरिकांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून उघड केला आहे. शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या ग्रामविकास रोजनांचे सरपंच विनोद शानक व ग्रामसेवक प्रितम पवार यांनी ग्रामविकासाच्या योजना गावात राबविण्याचे कागदोपत्री दाखवून ग्रामविकास निधीचा अपहार केल्राचा आरोप ग्रामस्थांना उघड केला आहे. वर्धाणे रेथील ग्रामस्थांनी मिळालेल्रा माहितीच्रा आधारे दि. 26 मे 2016 रोजी 36 हजार रु. व्हाऊचर पाणी पुरवठ्याच्रा विहीरीतून गाळ काढणेसाठी खर्ची काम आरफि पठाण (भडगाव) ता.साक्री रा व्यक्तीं नावे दाखविली गेली. मात्र ग्रामस्थांनी आरिफ पठाण रा व्यक्तीशी संपर्क केला असता आपण असे कुठलेच काम केले नाही, अशी लेखी स्वरूपात कारदेशीर नोटीस करून ग्वाही दिली आणि मी अशा कुठल्याही स्वरूपाची रक्कम घेतली नसल्याचे ग्रामस्थांना सांगितले.