वर्धापन म्हणजे आत्मपरीक्षणदिन

0

शेंदुर्णी। ग्राजारच्याने ग्रामीण भागात, संस्थेचा वर्धापन दिन हा खर्‍या अर्थाने आत्मपरीक्षण दिन असतो असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केला. आजच्या इंटरनेटच्या युगात माहिती आणि ज्ञान वेबसाईटवर खुल्या स्वरूपात उपलब्ध आहे. शिक्षकांनी आपल्या शिकवण्याच्या पध्दतीत बदल करायला हवा तसेच संस्थेने देखील त्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी केले. शेंदुर्णी येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचा 73 वर्धापनदिन सोहळ्यात सोमवारी 17 रोजी आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र लढा व संयुक्त महाराष्ट्र चळवळ यात योगदान देणारी संस्था तसेच संत, शाहिर आणि गुणवंतांची खाण असलेल्या शेंदुर्णीच्या भूमीत आपला सत्कार झाल्याबाबत आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी माझ्या दालनाची कवाडे नेहमी उघडी असल्याचे त्यांनी पुढे बोलतांना सांगितले.

एंडॉलमेंट प्राईज महावि
एंडॉलमेंट प्राईजेसची महाविद्यालयाने केलेली असून त्याचे समन्वय डॉ.प्रशांत देशमुख यांनी केले. दिपक शेळके, जैन भाग्यश्री, प्रशांत धनगर, उज्वला चौधरी, पाटील भूषण, बारी दिपाली, शुभांगी बारी, सागर माळी, सुनील राठोड यांचा गौरव करण्यात आला आहे. उत्कृष्ट कविता उमवि नियतकालीक स्पर्धेत गौरव बारी, गौरव हरिदास, शुभम बारी, धनश्री पाटील सुवर्णपदक, डॉ.शाम साळुंखे यांचा सत्कार केला.

गुणवंताचा सत्कार
याप्रसंगी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर यश मिळविणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. माजी आरोग्य अधिकारी डॉ.संजय सोनवणे यांचा चिरंजीव सौरभ सोनवणे हा युपीएससी परिक्षा उत्तीर्ण झाल्याने त्याचा यावेळी सत्कार करण्यात आला. स्कॉलरशिप परिक्षेत यश मिळविणार्‍या काबरा संतोष, श्रावणी गरुड, श्वेता प्रकाश नाईक, तेजस्विनी सोनवणे, स्नेहा पाटील यांचा समावेश होता.

यांची होती उपस्थिती
संस्थाध्यक्ष संजय गरुड, पी.गणेश, सागरमल जैन, शांताराम गुजर, अविनाश निकम, अशोक जैन, प्रभाकर सपकाळ, प्राचार्य बी.जी.मांडवळ, प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील, उपप्राचार्य प्रा.एन.एस.सावळे, उपप्राचार्य प्रा.आर.जी.पाटील, प्रा.आर.डी.गवारे, प्रा.दिनेश पाटील, डी.आर.शिंपी, सुहास जैन, उपसरपंच वैशाली पाटील, सूत्रसंचालन पी.जी.पाटील, डॉ संजय भोळे यांनी मानले.