भुसावळ- वर्धा-भुसावळ पॅसेंजरमध्ये निर्मला साठे (वय 50, रा. भोपाळपुरी, मंडईवाडा, जि. चंद्रपूर) या महिलेचा रविवारी मृतदेह आढळला. एसएलआर डब्यात (नंबर 5723) यात एका महिला प्रवाशांचा मृतदेह पडला असल्याचा संदेश उपस्टेशन व्यवस्थापक यांनी लोहमार्ग पोलिसांना दिल्याने सहायक फौजदार अरूणा पोहरे व पोलिसांनी लोको यार्डमध्ये जात डब्याची तपासणी केली असता त्यात महिलेचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी रितसर पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात रवाना केला. तपास सहायक फौजदार पोहोरे तपास करीत आहेत.