वर्ध्यातील संतापजनक घटना: हिंगणघाट बंदची हाक !

0

वर्धा : वर्ध्यात समाजमन सुन्न करणारी घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून युवकाने तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तरुणीची वाचा गेली आहे. डोळे देखील कायमचे जाण्याची भीती आहे. या घटनेवरून संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून आज सर्वपक्षीयांनी हिंगणघाट बंदचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थिनींनी मोर्चा काढला असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

तरुणीही हिंगणघाटच्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयासाठी अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेली तरुणी सोमवारी सकाळी आपल्या घरून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर आधीच दबा धरून बसला होता. तिला पाहताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि अतिशय निदर्यतेने तिला जाळण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर काहींनी तिच्या अंगावर पाणी ओतून आगीवर नियंत्रण आणले. मात्र, तोपर्यंत ती ४० टक्के भाजली. तिला आधी हिंगणघाट रुग्णालयात आणि नंतर नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिचा चेहरा पूर्णपणे जळाला असून, ती वाचाही गमावण्याची भीती आहे. तसेच डोळे गमावण्याचीही शक्यता आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. पीडित तरुणी आणि आरोपी रोज बसने प्रवास करीत होते. मात्र, सोमवारी आरोपी दुचाकीने आला. त्याने कट रचून हे क्रूर कृत्य केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.