मुंबई । पाकिस्तान आणि वर्ल्ड इलेवनमध्ये तीन सामन्यांच्या टी-20 सिरीजला सुरुवात झाली. या वर्ल्ड इलेवन संघातमध्ये जगभरातील 7 देशांच्या 14 खेळाडूंनी सहभाग घेतला. मात्र, यामध्ये एकही भारतीय क्रिकेटर नाही. यावरून पाकिस्तानचे क्रिकेट चाहते काहीसे निराश आहेत. प्रामुख्याने या टीममध्ये एम.एस. धोनी विराट कोहलीची गरज होती असे ट्वीट पाकिस्तानातून केले जात आहेत.
पाकला गेले नाही भारतीय क्रिकेटर्स
भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सीमावाद, घुसखोरी आणि दहशतवादावरून संघर्ष सुरू आहे. अशात दोन्ही देशांमध्ये एकही दुहेरी क्रिकेट सामना खेळला जाणार नाही असे पीएम मोदींच्या केंद्र सरकारने आधीच स्पष्ट केले. भारतीय खेळाडू सुद्धा पाक दौर्यास तयार नाहीत. इंडियन प्लेयर्स खासकरून धोनी आणि विराट वर्ल्ड इलेवनमध्ये नसल्याने पाकिस्तानी चाहते निराश आहेत. त्यांनी आपले दुख ट्वीट करून व्यक्त केले आहे. टी-20 सिरीजमध्ये पाकिस्तान आणि वर्ल्ड इलेवनचे तिन्ही सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअमवर खेळले जाणार आहेत.