वर्ल्ड रेसलिंगमध्ये साक्षी मलिक 5व्या स्थानावर

0

नवी दिल्ली । भारताला कुश्ती या खेळात पहिले पदक मिळवून दिले ते महिला खेळाडूने ती म्हणजे साक्षी मलिक आहे. रिओ ऑलिपिक्समध्ये कुश्ती खेळत असतांना पिछाडलेल्या साक्षीने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर खेळत ती विजयाचा मानाचा तुरा रोवला. भारताला महिला कुश्तीत पहिले पदक मिळवून दिले.याच बरोबर तिने अजुन एक मानाचा तुरा भारताच्या नावावर रोवला आहे. जगातील 20 टॉप रेसलिंगच्या यादीत 5 स्थानावर आपले नाव कोरले आहे.

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या टॉप 20 यादीत साक्षी
साक्षी मलिक ही पहिला कुश्तीपटू जीने आपल्या नावावर पहिले ऑलिपिक पद मिळविले आहे.त्याचबरोबर तीने नुकतेच दोन एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकली.तिच्या जिवनातील एक महत्वाचा प्रवास सुरू झाला असतांना तिला लागलीच एक अजुन चांगली बातमी मिळाली आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या टॉप 20 यादीत साक्षीने पाचवे स्थान मिळविले असून 58 किलो गटात साक्षीने रिओ ऑलिपिक्समध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे. कुस्तीत ऑलिंपिक पदक मिळविणारी साक्षी पहिली भारतीय पहिलवान महिला आहे. या क्रमवारीत पहिल्या 20 मध्ये स्थान मिळविणारी ती एकमेव भारतीय खेळाडू आहे.या क्रमवारीत जपानच्या काओरी इचो प्रथम क्रमांकावर आहे. दोन नंबरवर रशियाची वालेरिया कुब्लावो तर तीन नंबरवर टयूनिशियाची मारवा अमरी व चार नंबरवर किरगीस्तानची इसुलु तेनबेकोवा आहे.