भुसावळ। गेले वर्ष हे रेल्वेच्या विकासासाठी महत्वपुर्ण ठरले असून रेल्वे मंत्री सुरेश प्रभुंच्या नेतृत्वात रेल्वेने भरगच्च विकास कामे केली. यात 2 हजार 855 कि.मी. नवीन रेल्वे लाईन, तसेच रेल्वे रुळांचे दुहेरीकरण, रुळांचे रुपांतर 935 किमी. नुतन रेल्वे लाईनची सुरवात करण्यात आली हे आजपर्यंतचे सर्वात मोठे यश असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. उत्तर-पूर्व मधे मीटर गेजचे ब्रॉड गेज मधे रुपांतरण करण्यात आले.
2 हजार कि.मी. रेल्वे लाईनचे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात 2013 कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले.1 हजार 306 ओवर ब्रिज तसेच सब-वे-पुर्ण करण्यात आले.यामुळे 484 रेल्वे क्रॉसींग फाटक बंद करण्यात आले.750 पुलांचे पुर्नवसन करण्यात आले.45 फ्रंट टर्मिनल सुरू केले गेले.गेल्या वर्षी 621 लोकोमोटिव निर्माण करण्यात आले होत.यावर्षी 658 निर्माण करण्यात आले.मागील आर्थीक वर्षात 3 हजार 978 डबे निर्माण करण्यात आले होते.या वर्षी 4 हजार 280 डबे तयार करण्यात आले. आर्थिक वर्ष 2015-2016 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2016-2017 मध्ये रेल्वेने केलेली विकास कामे व प्रगतीचा आलेख वाढता आहे.