हायपोग्लिसेमिया (कमी रक्तशर्करा) मुळे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येणाऱ्या रूग्णांसाठी एक उपाययोजना संशोधकांनी शोधून काढली आहे. मधुमेहाविषयक भाकितांसाठी नवा सांख्यिकीय मापदंड त्यांनी तयार केला आहे. लाखो लोक मधुमेहामुळे बळी पडतात. कैझर परमेनेंट डिव्हीजन ऑफ रिसर्चचे शास्त्रज्ञ अँड्र्यू कार्टर यांनी सांगितले की कमी रक्तशर्करा असली की तीव्र हायपोग्लिसेमिया होतो. त्याचा परीणाम म्हणजे अचानक कोसळणे, हृदयविकाराचा झटका, कोमा किंवा मृत्यू असतो. हे आपण रक्तातली साखर कमी झाली असे समजल्यावर टाळू शकतो.
हायपोग्लिसेमिया संदर्भातील धोक्यांचे वर्षभराचे भाकित करण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही घटकांचा अभ्यास केला व त्यांच्या आधारे उपाययोजना सूचविल्या. त्यांनी इन्सुलिनचा वापर, सल्फोनिलयुरियाचे सेवन, किडनीचे आजार, अतिदक्षता विभागात दाखल करण्याचे प्रसंग, वय यांचे मोजमाप करून प्रात्यक्षिक मापदंड तयार केला आहे. त्याच्या आधारे पाच टक्केपेक्षा जास्त गुणांक येत असेल तर जास्त धोका, एक ते पाच टक्के मध्यम धाका आणि एक टक्क्यापेक्षा कमी असल्यास कमी धोका असे वर्षभराचे भाकित या मापदंडाच्या आधारे करता येते. हा सांख्यिकीय मापदंड १३ लाख केसचा अभ्यास करून तयार केला आहे.