वर्षावावास मालिकानिमित्त धार्मिक प्रवचन

0

मुंबई । भारतीय बौध्द महासभा (शाखा महिला) व भारतीय बौध्द विकास मंच यांच्या वतीने भिमराव आंबेडकर कार्याध्यक्ष भारतीय बौध्द महासभा यांच्या आदेशानुसार वर्षावावास मालिका राबवण्यात येत आहे. सदर कार्यक्रम शाखेचे सरचिटणीस कविता जगदीप कांबळे यांच्या निवासस्थानी घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी धार्मिक प्रवचन देण्यासाठी आंबेडकर भवन येथून केंद्रीय शिक्षक शाहीर बौध्दाचार्य संभाजी भोरे आले होते. कार्यक्रम बुध्द वंदना घेऊन सुरवात झाली. सदर कार्यक्रमासाठी ुश ींहश शिेश्रिश या नाटकाचे दिग्दर्शक ज्वालि मोरे, अभिनेत्री सीमा पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमात बौध्दाचार्य संभाजी भोरे यांनी पुणे करार विषयी माहिती दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधी यांना कसे जीवदान दिले? महात्मा गांधी यांनी राखीव जागांना कसा विरोध केला? ते महत्त्व पटवून दिले.

रमाबाईचा पुरस्कार देऊन सन्मान
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाखेच्या अध्यक्षा कल्पना पवार होत्या. सीमा ताई पाटील यांनी सांगितले की दीक्षाभूमीवर माता रमाबाईचा पुरस्कार देऊन सन्मान केला त्यामुळे माझ्या समोर बाकीचे पुरस्कार खूप लहान आहे. मी स्वतःला भाग्यवान समजले. भोरे गुरूजी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर खूप मोलाची मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वश्री राजेंद्र नगराळे, गणपत गांगुर्डे, बौध्दाचार्य शशिकांत कडलक, राजाराम कांबळे, सिद्धार्थ कांबळे, पांडुरंग संगारे यांची भाषणे झाली. सदर भारतीय बौध्द विकास मंचचे सचिव जगदीप कांबळे यांनी सगळ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी शाखेचे पदाधिकारी सिंधुताई अभंग, मिसाळ ताई, रोकडे ताई, रोहिणी कांबळे, तृप्ती वाघमारे, सुनिल धनावडे, ज्ञानेश्वर वाघमारे, आशिष कांबळे, निलेश कांबळे, शशिकला जाधव हे उपस्थित होते. जगदीप कांबळे यांच्या वतीने खिरदान, अल्पोपाहार देण्यात आला.