मुक्ताईनगर । लग्नाच्या वर्हाडाच्या वाहनाला हरताळे फाट्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सहा जण जखमी झाल़े सोमवारी दुपारी ही घटना घडली़ नसीर खान (भुसावळ), ईकबाल खान सोहरा खान (65), अनिस खान जब्बार खान (32), शहनाजबी अमजदखान (34), शमीम जब्बार खान (35), सफियाबी ईस्माईल खान (52), शाहीन बीऩसीर खान (46) अशी जखमींची नावे आहेत. चारचाकी (एम़एच़19 सी़एफ़1065) तील वर्हाडी हरताळे येथील लग्न आटोपून भुसावळकडे येत असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चारचाकी रस्त्याच्या पलीकडे तीन पलट्या घेत उलटली़ जखमींना शेख सलीम, जावेद खान सईद खान, गयास अली नजीर अली, शेख अशपाक शेख सांडू पिंजारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात हलवल़े