भुसावळ- मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी गेलेल्या वर पित्याचा अपघातात मृत्यू झाला होता. या प्रकरणी भुसावळच्या पॅजो चालकाविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
भगीरथ शाळेचे निवृत्त असलेले शिक्षक पांडुरंग पोपट कोळी (65, के.सी.पार्क, कानळदा रोड, जळगाव) हे शनिवार, 28 रोजी मुक्ताईनगर येथे पत्रिका वाटपासाठी गेले होते. वरणगाव येथील शेतकी संघाजवळ त्यांच्या दुचाकीला आरोपी मोहम्मद आसीफ रहेमान (खडका रोड, भुसावळ) याच्या पॅजो (एम.एच 19 -0675) ची धडक बसल्याने कोळी यांचा जागीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे कोळी हे अपघातानंतर अपघातस्थळी तासभर पडून होते तर त्यांचे जावई पोलीस कॉन्स्टेबल विजय सोनवणे यांना दूरध्वनी आल्यानंतर त्यांनी कोळी यांना रुग्णालयात हलवल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. सोमवारी वरणगाव पोलिसात पॅजो चालक मोहम्मद रहेमान विरुद्ध गणेश पांडुरंग कोळी (28) यांनी फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुनील वाणी करीत आहेत.