चाळीसगाव । तालुक्यातील मौजे वलठाण पाटे येथील अंगणवाडी च्या इमारतीमध्ये बालवाडीची शाळा भरते या इमारतीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले असून या बांधकामाची चौकशी व्हावी अन्यथा गावातील नागरिक आंदोलन करतील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (अ) चाळीगाव तालुकाध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम विभाग जि.प जळगाव यांना दिला आहे.
निवेदनातील ठळक मुद्दे..
दिलेल्या निवेदनात, ‘मौजे’ वलठाण पाटे ता चाळीसगाव येथे अंगणवाडीच्या इमारतीमध्ये बालवाडी मधील लहान मुले मुली शिक्षण घेत आहे. सदर इमारत चे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. फसदर बांधकाम सन 2012-13 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश असताना या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन त्यांस मोठं – मोठे तडे पडले आहेत. सदर इमारत सन 2013 ते नोव्हेंबर 2016 पर्यंत रिकाम्या अवस्थेत होती. या इमारतीत अंगणवाडी वर्ग केव्हापासून सुरु झाले याची देखील चौकशी व्हावी. इमारतीच्या बांधकामास संबंधित शाखा अभियंता व ठेकेदार यांची चौकशी होऊन बांधकाम पुन्हा चांगल्या स्थितीत व्हावे लवकरात लवकर चौकशी न झाल्यास इमारतीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून चौकशी व्हावी अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करतील. असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत गट विकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांना संबंधित माहिती देऊन देखील 7 महिने उलटले आहेत. त्यांनी अर्जाची दाखल घेतली नाही म्हणून आपणास पत्र दिले असल्याचे म्हंटले आहे.