पालघर : बोईसर रेल्वे स्थानकाजवळील ट्रैकखालील स्लीपरचा भराव खचल्याने गुजरातहुन मुंबईकडे जाणार्या वलसाड फास्ट पॅसेंजरचा एक डब्बा रुळावरुन उतरून फलाटाला घासला.यामुळे ऐन कामावर जान्याच्या वेलेतच ही घटना घडल्याने चाकर माणयांंचे हाल झाले.विशेष म्हणजे ही घटना घडली त्याच्या अवघ्या दहा मिनिटांपूर्वी ह्याच ट्रैकवरुन राजधानी एक्सप्रेस भरधाव वेगाने गेली. त्यामुळे पश्चिम रेल्वेच नशीब बलवत्तर असल्याने बोईसर येथे मोठा अपघात टळला.
मुंबई व उपनगरात काम करणार्या हजारो नागरिकांची ‘लाइफलाइन’ असलेली वलसाड फास्ट पॅसेंजर सुमारे वीस मिनिटे उशिराने म्हणजे सकाळी 7.20 वाजताच्या सुमारास बोईसर स्थानकात आली. आपल्या नेहमीच्या निश्चित असलेल्या ठिकाणावर ही गाडी थांबवण्या ऐवजी ही गाडी बोईसर स्थानकात सुमारे 50 मीटर पुढे गेल्याचे प्रवाशांनी सांगितले. या दरम्यान गाडी थांबत असतानाच या गाडीचा दुसरा डबल डेक्कर डबा फलाटाला लागला. यामुळे फलाटाच्या काही भाग उखडला गेला तर डबा ही घासला गेला
अपघातानंतर वलसाड फास्ट पॅसेंजर ही बोईसर स्थानकात रिकामी करण्यात आली. मुंबईकडे जाणार्या इतर गाड्या इतर ट्रॅक वरून पुढे काढण्यात आल्या. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्याचे वेळापत्रक विस्कळीत राहिले. सुमारे दोन तासानंतर ट्रॅक खालील अतिरिक्त ‘सपोर्ट’ लावून वलसाड फास्ट पॅसेंजर मुंबईकडे रिकामिच रवाना करण्यात आली. या घटनेमुळे कोणालाही दुखापत झाली नसली तरी कामावर जाण्यास या भागातील कर्मचार्यांना विलंब झाला.
विशेष म्हणजे बोईसर येथून सकाळी 7.10 वाजल्याच्या सुमारास या मार्गावरून राजधानी एक्सप्रेस ही गाडी बोईसर स्थानकातून जलद गतीने गेली. याच पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून ट्रॅकचे काम सुरू असल्याने गाड्याचा वेग मर्यादित ठेवण्यात आला होता. तरी देखील पश्चिम रेल्वेचे नशीब चांगले असल्याने बोईसर येथे होणारी मोठी दुर्घटना टळली.