पिंपरी : वाचन चळवळीला गती मिळावी, या उद्देशाने एसटी महामंडळात चालक, वाहक आणि कामगारांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम पहिल्यांदाच सोहम सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्यातर्फे हाती घेण्यात आला आहे. कामगारांना थेट डेपोमध्ये ही पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. त्यासाठी आवश्यक पुस्तकांचे एक कपाट देण्याचे नियोजन आहे. संत तुकारामनगर येथील विरंगुळा केंद्रात असलेल्या सोहम ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचनासाठी घेऊन जाऊ शकतील.