तळोदा। तळोदा शहराबरोबरच जिल्ह्यासाठी सेतू म्हणून उत्सुकता लागून असलेला हातोडा पूल पूर्णत्वास आला असला तरी पुलास आवश्यक वळणरस्ता नसल्यामुळे वाहतूक कुठून नियंत्रित केली जाईल? असा प्रश्न उभा राहणार आहे हे बघता तळोद्यातील तरुणांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांना एका निवेदनाद्वारे वळण रस्त्याची मागणी केली आहे.
यावेळी बाबग्रुपच्या वतीने हतोड़ा पुलाला अंकलेश्वर ब्रहानपुर महामार्गाला जोडणार्या तळोदा शहर बायपास रस्त्या तयार व्हावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर रोहन माळी, आशिष माळी, हितेश माळी, यश सूर्यवंशी, प्रफुल माळी, भावेश टवाळे, योगेश पाडवी, यश सुर्यवंशी दीपक गोसावी मनीष हिवरे, वसंत गोसावी, सागर माळी, निखिल सूर्यवंशी, सारंग चव्हाण, अभय सुरुवंशी, किरण जोहरी आदींच्या सह्या आहेत.