वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम

0

पुणे । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व थोर स्वातंत्र्य सेनानी स्व. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यख अभिनव कला विद्यालय, टिकळ रोड येथील स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, काँग्रेसचे नेते उल्हासदादा पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, रतनलाल सोनग्रा, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, अ‍ॅड.अभय छाजेड, सौ. नीता रजपूत, विकास लांडगे, रविंद्र म्हसकर, डॉ. सतिश देसाई, मुकारी अलगुडे, तानाजी निम्हण, आनंद छाजेड, सुनिल शिंदे, राजू साठे, प्रा. वाल्मिक जगताप, विठ्ठल थोरात, संदिप मोकाटे, नरेंद्र व्यवहारे, विनय ढेरे, जयकुमार ठोंबरे, विश्‍वास दिघे, राजेश शिंदे, राजेंद्र पेशने आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता तिवारी यांनी केले, तर आभार भगवान धुमाळ यांनी मानले.

सर्वांना समजून घेणारे नेते
रमेश बागवे म्हणाले, वसंतदादा पाटील हे एक महाराष्ट्राला लाभलेले गरिबांचे आधार असलेले मुख्यमंत्री, कार्यकर्त्यांना ताकद देणारे, सर्वांना समजून घेणारे तथा पक्षाबरोबर निष्ठा व कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे होते. पवार म्हणाले, 1985 साली वसंतदादा मुख्यमंत्री असताना एक क्रांतीकारी निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी महाष्ट्रात खासगी इंजिनिअरिंग व मेडिकल महाविद्यालये उघडण्यास परवानगी दिली त्याचा फायदा आज आपल्याला जाणवत आहे.

पुणे शहर ’राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने अभिवादन
पुणे शहर ’राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पक्षाच्या हिराबाग येथील पक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश युवक चे सचिव निलेश वरे यांच्या हस्ते वसंतदादा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शंकर शिंदे, समीर निकम, सुरेश पवार, शाम ढावरे, तुकाराम खांडेकर, सुकेश पासलकर, अविनाश वेल्हाळ, हेमंत येवलेकर, बाळासाहेब ढमाले, अ‍ॅड.औदुंबर खुने पाटील, संजय गाडे उपस्थित होते.