वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

0

मुंबई – वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान, या संस्थेच्या यंदाच्या पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत करण्यात आली. यात ५१ हजार रूपयांचा सामाईक पुरस्कार भारतीय अॅग्रो इंडस्ट्रिज फाउन्डेशन यांना जाहीर झाला.

प्रतिष्ठानचे सचिव अॅड. विनयकुमार पटवर्धन यांनी हा पुरस्कार व अन्य १२ कृषिक्षेत्राशी संबंधित पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. इतर पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे (रूपये २१ हजार प्रत्येकी)- कृषि पुरस्कार- डॉ. तपस भट्टाचार्य, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ (दापोली), कृषि प्रक्रिया पुरस्कार- अशोक व ज्योत्स्ना सुरवाड. नाशिक, कृषि साहित्य पुरस्कार- विनायक बावस्कर पुणे, कृषि पत्रकारिता- विनोद इंगोले, नागपूर, कृषि उत्पादन निर्यात पुरस्कार- महिन्द्रा शुभलाभ सर्व्हिसेस, मुंबई, फलोत्पादन पुरस्कार- भरत रामप्रसाद मंत्री, जालना, भाजीपाला उत्पादन पुरस्कार- टेटीबाई पावरा, नंदूरबार, फुलशेती पुरस्कार- संजय जामकर, नांदेड, सामाजिक वनीकरण- अमोल रोगे, लातूर, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय- अरूण पाटील, कोल्हापूर, जलसंधारण- मरवाड विकास मंच, जळगाव आणि पर्यावरण पुरस्कार- अभिजीत घोरपडे, पुणे. १९८६ ते २०१६ या काळात या संस्थेने या क्षेत्रांशी संबंधित २९० पुरस्कार देण्यात आले.