जळगाव । कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखान्यासह 56 हेक्टर जमीन विक्रीसाठी ऑनलाईन टेंडरद्वार निविदा मागविल्या जाणार असल्याचे बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी गुरूवार रोजी पत्रकारांशी बोलतांना सांगितले़.29 रोजी संचालक मंडळांची बैठकीत वसंत सहकारी साखर कारखाना विक्रीची प्रक्रियेस मान्यता, मधुकर खारखान्यासाठी 3़75 लाख कर्ज मंजूर, लवकरच नोकर भरती ,बेलगंगा कारखान्यातील साखर विक्री, कर्जमाफीबद्दल सरकारचे अभिनंदनाचा प्रस्ताव हे विषय घेण्यात आले. कारखान्यासह 56 हेक्टर जमीन विक्रीची ऑनलाई टेंडर मागविण्यात येणार आहे़ हा कारखाना विक्री करण्या अगोदर राज्य सरकारकडून हमी पत्र मागविले जाणार असल्याचे सांगितले. याचबरोबर नोकरभरती प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे गैरप्रकार होणार नाही.
375 लाख रूपये मंजुर
मधुकर साखर काखान्यासाठी 3़75 लाख कर्ज मंजूर मधुकर सहकारी साखर कारखान्याची 7़25 लाखाची मागणीनुसार त्यांना 3़75 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे़ सर्वच कारखाने अडचणीत आहे़ फक्त मधुकर सहकारी साखर कारखानाच सुरु राहील बाकी सर्व कारखान्यांची परिस्थिती खराब आहे़ कर्मचार्यांचे एका महिन्याचा पगार होऊन तो पुन्हा सुरु रहावा यासाठी हे कर्ज दिले असल्याचे सांगण्यात आले़
कर्जमाफीबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन
कर्जमाफीचे पत्रक 28 जून रोजी प्राप्त झाले आहे़ त्यानुसार पात्रता धारकांची यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे़ प्रत्येकाला शासनाच्या नियमाप्रमाणे कर्जमाफी त्यांच्या बँक खात्यातच मिळणार आहे़ एवढ्या मोठ्या कर्जमाफी बद्दल राज्य सरकारचा अभिनंदनाचा ठराव या बैठकीत घेण्यात आला़.यावेळी माजी महसूलमंत्री आ़एकनाथराव खडसे, उपाध्यक्ष आ़किशोर पाटील, आ़.राजुमामा ळोळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, वाडीलाल राठोड, डॉ़सुरेश पाटील, गणेश नेहते, अनिल भाईदास पाटील, तिलोत्तमाताई पाटील व कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्या उपस्थिती होती़
बेलगंगाची साखर विक्री
बेलगंगा कारखाना बंद पडल्यापासून बरीच साखर खराब झाली आहे़ आणि जी आहे ती विक्री संदर्भात आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला़ त्यानुसार प्रस्ताव मागविण्यात आल्याचे सांगितले. राज्य सरकारकडे नोकर भरतीसंदर्भात परवानगी मागितलेली आहे. भरतीसंदर्भात जिल्ह्याला प्राधान्याची परवानगी मागितली होती़ ती दिली जात नसल्याचे आ.ख़डसे यांनी सांगितले़ राज्यसरकारकडून आलेल्या चार खासगी कंपन्यांचे नावांपैकी पुढील बैठकीत एका कंपनीचे नियुक्त केली जाणार आहे़