A passenger’s mobile worth 36,000 was stolen from Mumbai-Amravati Express भुसावळ : मुंबई-अमरावती एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या मुकुंद वसंतराव देशमुख (वसई) हे भुसावळ-वसई प्रवास करीत असतांना त्यांचा 35 हजार रुपये किंमतीचा मोबाईल कोणी तरी चोरट्यांने चोरून नेला.
भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा
देशमुख हे दादर ते अमरावती असा प्रवास करीत असताना, त्याना झोप लागली असता, त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन 35 हजार 990 रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.