मुंबई-तटरक्षक दलाने वसईजवळील समुद्रात पाणजू बेटानजीक संशयास्पदरीत्या जाणाऱ्या ६ बोटींचा पाठलाग करून त्यातील दोन बोटींना ताब्यात घेतले आहे. या बोटीतून १४ संशयित बांग्लादेशीय नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, इतर चार बोटी आणि त्यावरील संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले.
तटरक्षक दलाकडून अरबी समुद्रातील हालचालीकडे लक्ष ठेवण्यासाठी ‘सजग’ मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत गस्त घालत असताना वसईच्या पाणजू बेटाजवळ समुद्रात ६ बोटी संशयास्पद हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले.
आबिल शेख (२५), शफीकुल (२७),आहाजित(३३), मोईद्दीन (४५), इस्लाम (३५), बी.शेख (२२), शैफुल (२७), एन मुल्ला (४५), रफीगुल (१९), शहीफुल (२७), जे मुल्ला (४०), मोंडल (२८), पायनल (३८), इब्राहिम शेख (२५) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. तटरक्षक दलाचे कमांडर विजय कुमार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.