वसईत कॅब कंपनीच्या कारशेडला आग

0
मुंबई : वसईतील टॅककॅब कंपनीच्या कारशेडला पहाटे अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. मालाजीपाडा – ससूनघर परिसरात कंपनीचे हे कारशेड उभारण्यात आले आहे. मात्र आगीचे कारण अद्यापही समोर नसुन आग नियंत्रणात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.