वसईत लिफ्टमध्ये अडकून चिमुरड्याचा मृत्यू

0

मुंबई : वसईत लिफ्टमध्ये अडकून सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वसई पूर्वेला सातीवली येथील डायस रेसिडेन्सी या सात मजली टॉवरमधील लिफ्टमध्ये अडकून मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. वालीव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेमुळे परिसरारत हळहळ व्यक्त केली जात आहे.