वसई पूर्व भागातील रस्ते प्रवासासाठी धोकादायक

0

विरार । वसई तालुक्याच्या पूर्व भागात अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामध्ये मेढेफाटा ते कळभोण रस्ता अतिशय खराब झाला असून जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे व रुग्णांना याची जास्त झळ पोहचत आहे. गणेशोत्सव जवळ आला असून यावर्षी भालीवली ते आडणे रस्त्यावरील जांभुळपाडा व पुढच्या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत.

तसेच मेढे ते कलभोंण व खानिवडे ते हेदवडे, चिमणे हे मार्ग नादुरुत्त झाल्याने या वर्षी या मार्गावर बाप्पाचे स्वागत खड्ड्यातून होणार आहे. खड्ड्यांमुळे वाहन चालवायचे तरी कसे हा प्रश्न वाहन चालकाला पडत आहे. तर खड्डे चुकवण्याचा नादात आपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशाच प्रकारे खड्डे चुकवण्याचा नादात भाताणे येथे एसटी बस मार्गाच्या कडेला रुतल्याने मोठा अपघात टळला.