विरार । वसई विकास सहकारी बॅक हि पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य बँक आहे. कोकणातील मोजक्याच सहकारी बँकांपैकी स्थापनेपासूनच्या शेड्यूल दर्जा मिळवणारी ही देशातील एकमेव बँक आहे. सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या वसई विकास सहकारी बँकेची 34 वी वार्षीक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.17) वसईत आयोजित करण्यात आली होती. आजी-माजी संचालक मंडळांसह, पालघर जिल्ह्यातील बॅकेचे भागधारक सभासद मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
वसईतील किरवली गावात एका छोट्या लावलेल्या रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेली वसई विकास सहकारी बॅक 4 ऑक्टोबर 1984 रोजी स्थापन झाली होती. बॅकेने काही वर्षात सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. 21 शाखांद्वारे ग्राहकांना दर्जेदार सेवा पुरवणारी व शेड्यूल बॅकेचा दर्जा प्राप्त झालेल्या या बॅकेने जिल्ह्याबाहेरही ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर विश्वास संपादन केला आहे.