वसतीगृहाचे अहिल्याबाई होळकर नामकरण करा

0

मुक्ताईनगर । येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृहास पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर व नाट्यगृहास छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल पाटील व शिवसैनिकांनी तहसिलदारांना निवेदन दिले.

या आहेत मागण्या
शहरात 15 वर्षांपासून ग्रामपंचायतमार्फत बांधलेल्या नाट्यगृहास छत्रपती शिवाजी नाट्यगृह नामकरण अपूर्ण असल्याने ते करण्यात यावे त्याचप्रमाणे आदिवासी विभागामार्फत शासकीय वसतीगृह गेल्या 10 ते 15 वर्षांपासून सुरु असून अजूनही त्याचे नामकरण करण्यात आलेले नाही.

आंदोलन छेडण्याचा इशारा
त्यामुळे या वसतीगृहास पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर आदिवासी मुलांचे वसतीगृह असे नामकरण करण्यात यावे. याकरीता शिवसेनेतर्फे निवेदन देवून नामकरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी तालुकाप्रमुख छोटू भोई, शहरप्रमुख बाळा भालशंकर, अफसर खान, उपशहरप्रमुख राजेंद्र हिवराळे, अमरदिप पाटील, निलेश बोराखेडे, पिंटू पाटील, गणेश टोंगे, प्रविण चौधरी, संतोष कोळी, प्रकाश गोसावी, सोपान मराठे, बन्ना पाटील, डॉ. सुनिल देवरे, शुभम तळेले, चेतन पाटील, अजगर शेख, प्रशांत वाघ, तानाजी धनगर, सचिन धनगर, राजेश जुंबळे, प्रशांत वाघ, जितेंद्र जुंबळे, चंद्रकांत मराठे, बबलू वंजारी आदी उपस्थित होते. सर्व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच यावर लवकरात लवकर कार्यवाहीची मागणी केली आहे.