‘वसाका’ विक्रीसाठी निवीदा काढणार

0

जळगाव । तोट्यात गेल्यामुळे बंद पडलेल्या कारखान्यांची विक्री जिल्हा बँकेने सुरु केली आहे. गेल्या महिन्यात चाळीसगाव येथील बेलगंगा साखर कारखान्याची विक्री अंबाजी टे्रडींग कंपनीला करण्यात आली आहे. एरंडोल येथील वसंत साखर कारखाना (वसाका) देखील तोट्यात असून बंद पडले आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात वसाकाच्या विक्रीसाठी निवीदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून एमएचटी-सीईटी मार्फत निवीदा निघणार असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. जिल्हा बँक संचालकांच्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. संचालक मंडळाच्या बैठकीत एकुण 23 विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी महसूलमंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. येत्या गळीत हंगामाकरीता मधुकर साखर कारखान्याला 6 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

शेतकर्‍यांसाठी अपघात विमा
जिल्हा बँकेचे कर्जदार असलेल्या शेतकर्‍यांच्या डेबीट, के्रडीट तसेच किसान कार्डावर दोन लाख रुपयाचा अपघाती विमा उतरविण्यात येणार आहे. ज्या शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेचे डेबीट, के्रडीट अथवा किसान कार्ड घेऊन एकदा तरी एटीएमच्या माध्यमातून व्यवहार केल्यास हा विमा उतरविला जाणार आहे. अपघातात जखमी झाल्यास अथवा मयत झाल्यास विम्याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात 97 हजार किसान तर 8 हजार डेबीट असे 1 लाख 5 हजार कार्डाचे वाटप करण्यात आले आहे.

जिल्हा राज्यात अव्वल
शासनाने कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना जाहीर केली आहे. कर्जमाफीसाठी पात्र शेतकर्‍यांकडून ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झाले असून आजपर्यत जळगाव जिल्ह्यात 1 लाख 11 हजार शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले आहे. जिल्ह्यातील एकुण 2 लाख शेतकरी कर्जमाफीस मात्र आहे. कर्जमाफी अर्ज भरण्यात जळगाव जिल्हा हा राज्यात अव्वल असल्याचे आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

जिल्हा बँका डबघाईला
जिल्हा बँक ही शासनाकडून 9.5 टक्के दराने कर्ज घेऊन 4 टक्के दराने कर्जवाटप करते त्यामुळे जिल्हा बँका डबघाईला आल्या आहेत. सुपर्ण राज्यात हीच परिस्थिती असल्याचे आमदार खडसे यांनी सांगितले. शासनाने शेतकर्‍यांना दहा हजार रुपये उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले मात्र जिल्हा बँकेकडे निधी नसल्याने शासनाकडून निधीची मागणी करण्यात आली. परंतू अद्यापही निधी उपलब्ध झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात दहा हजाराच्या मागणीसाठी एकही अर्ज आलेला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.