वसुंधरा राजे यांच्या गौरव यात्रेवर दगडफेक

0

नवी दिल्ली – राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या गौरव यात्रेवर दगडफेक झाली. तसेच त्यांच्या सभेमध्ये त्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजपने राजस्थानमध्ये गौरवयात्रा सुरु केली आहे. दरम्यान यात्रेच्या दुसऱया टप्प्यात, शनिवारी रात्री राजस्थानच्या पीपाड येथे ही घटना घडली. या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही .