शेतकऱ्यांनी एकत्र येवून स्थापन केलेला ‘वसुंधरा समूह’
पुणे – शेतकऱ्यांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या वसुंधरा समूह फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड वसुंधरा समूह शेतीचा भूमीपूजन सोहळा रविवार 21 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता भूतोंडे ता. भोर जि. पुणे येथे दिलीप झेंडे, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग यांच्या हस्ते होत आहे. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून भोर, वेल्हा मुळशी येथील स्थानिक आमदार संग्रामदादा थोपटे, बाळासाहेब बराटे अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट को ऑप फेडरेशन (मार्ट), आरिफ अहमद शहा कृषी विकास अधिकारी, जि.प.रत्नागीरी, जनार्धन वाघिरे इस्राईल शेती तज्ञ, काशिनाथ पागिरे निवृत्त कुलसचिव मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, सुनील बोरकर जिल्हा कृषी अधिक्षक आदी उपस्थित राहणार आहेत.
सोशल मीडीयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सध्या शेती परवडत नाही कर्जबाजारी होण्यापेक्षा विकून टाका अथवा नैराश्यातून आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत शेतकरी असतांना शेतकर्यांना मागदर्शन करण्याच्या भूमिकेतून संजय कुंभारकर यांनी फेसबुक वर शेतकरीराजा हा समूह तयार केला व स्वतः कुंभारकर व संजय नाना जगताप सोशल मीडीयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शेती प्रश्नावर चर्चा सुरु झाली जर शाश्वत शेती करायची असेल तर गटशेतीला पर्याय नाही ही संकल्पना पुढे आली. सदर संकल्पनेला महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे अतिशय मोलाचे सहकार्य मिळाले. मधल्या काळात शेतकरी राजा गृपने शेतकऱ्यांसाठी आयोजित मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सदर मेळाव्याला प्रल्हाद पोकळे, कृषी संचालक, फलोद्यान व राष्ट्रीय फलोत्पादन अभियान यांनी गटशेती व हायटेक शेती करण्याबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानुसारच संजय कुंभारकर यांनी वसुंधरा समूहाची स्थापना केली, त्यात 100 शेतकरी सभासद झाले. सर्वानी मिळून भूतोंडे परीसरात 16 एकर जमीन घेतली.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
16 एकर जमिनीवर कृषी पर्यटनपण विकसीत होणार आहे. वसुंधरा समूह फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष संजय कुंभारकर यांनी समूहातील तसेच भोर भूतोंडे परीसरातील शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव मिळावा म्हणून लवकरच शेतकरी ते ग्राहक अशी योजना आणणार असून सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहचवणार असल्याचे कळविलेले आहे. वसुंधरा समूह शेतीचा भूमीपूजन सोहळ्यासाठी सूर्यकांतभांडे पाटील, मृदृला रुद्रवार, महेश पोमन, दयानंद निंबोळकर आदी सदस्य परीश्रम घेत आहेत.