नवापूर। नोटीसा देऊन देखील कराची रक्कम जमा न करणार्या थकबाकीदारांकडे नगरपालीकेच्या विशेष वसूली पथकांना रोख रक्कम सहीत वस्तू स्वरूपात कर वसूल करण्याचा सपाटा लावला आहे. नवापूर नगरपालीकेची घरपट्टी नळपट्टी अशा कराची रक्कम नागरीकांकडे थकबाकी असल्याने ती लाखोचा घरात आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित विभागाच्या कर्मचारी यांनी मार्च आखेर वसूलीची टक्केवारी न वाढविल्यास त्यांचावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे प्रभारी मूख्याधिकारी शाम गोसावी यांच्या मार्गदर्शना खाली चार विशेष वसूली पथक निर्माण करण्यात आलेत. थकबाकी असलेल्या नागरीकांना कराची रक्कम भरण्यासंबंधी अगोदर नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. त्या उपरांत ठरावीक मूदत देण्यात आली होती. तरी देखील संबंधित थकबाकीदाराने सदर रक्कमेचा भरणा न केल्याने सोमवती आमवश्याचे मूहर्त साधत नगरपालिका वसूली पथकाने प्रथम करदात्याचा घरासमोर दूकाना समोर चून्याची निशानी करून जोर जोरात ताशे वाजवून रोख रक्कम व रक्कम न दिल्यास सामानाची जप्ती करून धडक मोहीम हाती घेतली आहे.
नागरीकांनी वसुलीसाठी सहकार्य करण्याचे केले आवाहन
शहरातील कॉलेज रोड वरील फॅक्स ऑटो यांच्याकडे कराची रक्कम बाकी असल्याने मालक अमजद दाउद खाटीक यांनी ती देण्यास असमर्थता दर्शवल्याने पालिकेची वसूली पथकाने त्यांचा दूकानातील टायर उचलून कराची रक्कम वसूल केली. दिवसभर ही कारवाई रख रखत्या उन्हात सूरू होती व मार्च आखेरपर्यंत राहणार असून शहराचा विकास कामासाठी व वसूलीची टक्केवारी वाढविण्यासाठी व जप्तीची नामूशकी टाळण्यासाठी नागरीकांनी कराची रक्कम भरून सहकार्य करावे आसे अवाहान मुख्याधिकारी शाम गोसावी यांनी केले आहे. या पथकात कार्यालयीन अधीक्षक मिलीद भामरे, वसूली विभाग प्रमुख परशराम ठाकरे, पथक प्रमूख राजेंद्र चव्हाण, भरत पाटील, अभियंता सूधिर माळी, सतिष बागूल, नथ्थू अहिरे, रविद्र बागल, महमद पठाण, राजू गावित, राकेश गावित, प्रशात भट, लेखापाल प्रेमानंद गावित, रमेश सोनार व इतर कर्मचारी काम करीत आहेत.