पाणीपट्टीपोटी जिल्ह्यात 3 कोटी 71 लाख थकीत
जळगाव । जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींकडे पाणीपट्टीची वसूली थकीत असल्याने पाणी पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. मात्र वास्तविक संपूर्ण जिल्ह्यात पाणीपट्टीची वसुलीपोटी 3 कोटी 71 लाख रुपये थकीत असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे यांनी दिली. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता ही थकबाकी काही मोठी नाही, असे असतांना पाणी पुरवठा का खंडीत करण्यात आले असा प्रश्न पडला असल्याने थकबाकी वसुलीबाबत जिल्हा परिषद प्रशासनात आकडेवारीचा गोंधळ सुरु असल्याचे दिसून येते. संपूर्ण जिल्ह्यात मागील दोन-तीन वर्षापासून पाणीपट्टीच्या वसूलीपोटी 3 कोटी 71 लाख तर घरपट्टी वसुलीपोटी 3 कोटी 87 लाख रुपये थकीत असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातून मिळाली.