रोहा : रोहा-तळा मार्गावरील म्हसाडी येथिल कुणबी समाज विद्यालयात आदर्श युवा जीवन निर्माण संस्थेने गरजू विद्यार्थ्यांना वह्या, शालेय गणवेश, तसेच प्रथमोपचारासाठी साहित्य इत्यादी वस्तूंचं वाटप केलं. विशेष म्हणजे गेली तीन वर्षे या संस्थेचा हा उपक्रम सातत्याने सुरु आहे.