भुसावळ : तालुक्यातील वांजोळा येथील रहिवासी सलेल्या भुषण संभाजी पाटील (23) या तरुणाने गुरुवारी रात्री उशिरा राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.
मित्राच्या लग्नाहून परतल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
भूषण पाटील हा युवक आपल्या मित्राच्या लग्नानिमित्त रात्री नाचल्याचे सांगण्यात आले व त्यानंतर त्याने घर गाठल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेतला मात्र पहाटेच्या सुमारास गळफास घेतल्याची बाब समोर आली. याबाबत भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत भूषण याच्या पश्चात आई, वडिल, भाऊ असा परीवार आहे.