मुंबई: वांद्रे येथील शासकीय वसाहतीच्या पुर्निविकासाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून लवकरच त्याचा आराखडा तयार करून मुख्यमंत्रयाकडे ठेवण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीची अवस्था दयनिय झाल्याने या इमारतीचे छत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत या प्रकरणी अनिल परब यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे उत्तर दिले. वांद्रे येथील शासकीय जमिनीवर ९६ एकर जागेत शासकीय वसाहत ही १९५९ ते १९७५ च्या दरम्यान बांधलेली आहे. वांद्रे शासकीय वसाहतीत ३७० इमारती असून त्याचे आर्युमान ५० वर्षे आहे. याठिकाणी एकूण ३७० इमारती आहेत. त्यापैकी ३६ इमारती धोकादायक आहेत. त्या रिक्त करण्यात आल्या आहेत. 36 इमारतीच्या पूर्नबांधणीचे काम अर्थसंकल्पीय कामात १००. ८२ कोटी मंजूर आहेत. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन आराखडा तयार करण्यात येईल असे चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केलं.