वांद्रा येथे भीषण आग: ५०-६० झोपड्या जळून खाक !

0

मुंबई- वांद्रे येथील नर्गिस दत्त नगरमधील झोपडपट्टीत आज सकाळी भीषण आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत ५० ते ६० झोपड्या जळून खाक झाल्या.

अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी पोहोचले असून अरुंद रस्त्यांमुळे अडथळे येत आहेत. दरम्यान, वांद्रेमधील गरीबनगर झोपडपट्टीत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही भीषण आग लागली होती. या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले होते. ४ मार्च २०११ सालीही गरीबनगर झोपडपट्टीला आग लागल्यामुळे रहिवासी रस्त्यावर आले होते.

याला मनपा जबाबदार
अनधिकृत बांधकाम वाढले असून याबाबत मी वारंवार मनपाकडे तक्रार केली आहे. मात्र याकडे मनपा लक्ष देत नसल्याने अशा घटना घडत आहे असे आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केले आहे.