कंत्राटी कामाचे बिल मंजुरीसाठी मागितली लाच
चाकण । पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे बिल मंजूर करण्याचा प्रस्ताव खेड पंचारत समितीकडे पाठवण्रासाठी कंत्राटदाराकडून 25 हजार रुपयांची स्वीकारताना खेड तालुक्रातील वांद्रे गावाच्या ग्रामसेविकेला रंगेहाथ पकडण्यात आले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी आंबोली गावाजवळ रस्त्याच्या कडेला सापळा रचून ही कारवाई केली. सविता बाळासाहेब सईद (36, रा. मुळेवाडी रोड, मंचर ता. आंबेगाव, जि. पुणे) असे अटक केलेल्या ग्रामसेविकेचे नाव आहे.
पुणे विभागाची कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता सईद या खेड तालुक्रातील वांद्रे गावाच्या ग्रामसेविका आहेत. तक्रारदार हे कंत्राटदार असून, त्यांनी शासनाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे विकासांतर्गत वांद्रे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. सदर कामाचे बिल मंजुरीची कागदपत्रे पंचारत समिती खेड यांच्याकडे पाठवण्यासाठी सईद यांनी तक्रारदाराकडे 25 हजार रुपरांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या संबंधी लाचलुचपत प्रतिबंधक, पुणे विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून आंबोली गावाजवळ सार्वजनिक रस्त्याच्या कडेला सविता सईद यांना 25 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे करीत आहेत.