सातारा : वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. प्रतिभा शिंदे या भारतीय जनत पक्षाच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या.
नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे पती प्राध्यापक सुधीर शिंदे यांना ठेकेदाराकडून 14 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. शिंदे या अवघ्या एका मताने विजयी झाल्या होत्या. शौचालय बांधकामाच्या ठेकेदाराकडून त्यांनी व त्यांच्या पतीने लाच मागितली होती.
यंदा जनतेतून नगराध्यक्षांची निवड झाली होती. यात डॉ. प्रतिभा शिंदे यांना वाईच्या जनतेने निवडून दिले होते. एका कामाच्या मोबदल्यात ठेकेदाराकडे त्यांनी लाच मागितली होती. या प्रकरणी त्यांच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे. जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना लाच घेताना पतीसह अटक झाल्याने सातारा जिल्ह्यात हा चर्चेचा विषय झाला आहे.