पिंपरी-चिंचवड : दापोडी येथील हॅरिस पुलावरून आपल्या आठ महिन्याच्या बाळासह उडी घेत महिलेने सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आत्महत्या केली. शहापुरी असलम शेख (वय 20, रा. वाकड) तिचे नाव आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी तिचा मृतदेह बाहेर काढला आहे. मात्र, दोन वर्षाच्या जिशान या चिमुरड्याचा शोध काही लागला नाही. शहापुरी शेख किरकोळ भांडणामुळे घऱातून रागाच्या भरात भटकत-भटकत पूलावर आल्या. तिथे काहीवेळ रेंगाळत बाळासह नदीत उडी घेतली. यामध्ये शहापुरी यांनी बुरखा घातला असल्यामुळे त्यांचा मृतदेह पाण्यावरच तरंगत होता
लोकलमधून एकजण नदीत पडला
दरम्यान, ही शोध मोहीम सुरू असतानाच पुणे-लोणावळा लोकलमधून एकजण अचानक नदी पात्रात पडला. त्यामुळे जवांनानी शोध माहिम थांबवत संबंधीत इसमाला आधी बाहेर काढले. त्याला कृत्रीम श्वासोश्वास देऊन खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनास्थळी ओंध व पुणे कंट्रोलच्या अशा चार अग्निशमनच्या गाड्या, बोट व 13 लोक शोध काम करत आहेत.