वाकडमधील शिबिरात शंभर तरुणांनी केले रक्तदान

0

विठ्ठल सोशल फाउंडेशनने राबविला उपक्रम

वाकडःविठ्ठल सोशल फाउंडेशन व उत्कल समाज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि 1) वाकड येथे आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल शंभर तरुणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना कापडी पिशवी, गुलाब पुष्प व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कीर्तनकार ह.भ.प. महादेव महाराज भुजबळ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डीन डॉ. एल.के. त्रिपाठी, पोलीस फ्रेंड्सचे गजानन चिंचवडे, शंभूराजे प्रतिष्ठानचे भरत आल्हाट, माळी महासंघाचे शहराध्यक्ष अनिल साळुंखे, डॉ. अलका लिमये, सुरेश पाटील, उद्योजक पंडित आल्हाट, मधुकर भूमकर, संपत विनोदे, प्रकाश जमदाडे, बाळासाहेब भूमकर, डॉ. धीरज भूमकर, मोहन विनोदे, नाजीम मुल्ला आदी उपस्थित होते.

प्लास्टिकमुक्त जीवन शैलीचा अंगीकारावी
कार्यक्रमाचे उद्घाटक ह.भ.प. महादेव महाराज भुजबळ यांनी ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान, त्यासाठी हवे आहे मला तुमचे योगदान, तुमच्या रक्ताचा एक एक थेंब आहे खूप महान, त्यासाठी मित्रांनो तुम्ही करा रक्तदान’ ही कविता सादर केली. विठ्ठल सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र करपे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिकमुक्त जीवन शैलीचा अंगीकार करावा असे सांगितले. आधार रक्तपेढी व अंश आयुर्वेदिक चिकित्सालयांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यध्यक्ष संतोष माने, उपाध्यक्ष किरण माने, राहुल माने, सचिव किशोर गणगे, संकेत मुजमुले, खजिनदार आशिष शिंदे, नारायण तोडकर, सागर जाधव, सुरज लोंढे, अनिकेत केसकर, कृष्णा करपे, अमर पठाण, लखन पवार, नीरज सायकर, दिलीप राठोड, पवन दरवडे, आर्यन माने यांनी आयोजन केले. नारायण तोडकर यांनी सूत्रसंचालन केले तर राजेंद्र करपे यांनी आभार मानले.