वाकडमध्ये एकाच दिवशी दोन घरफोड्या

0
पिंपरी चिंचवड : वाकडमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये सोन्याचे, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 4 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. यातील एक घटना सोमवारी (दि. 14) दुपारी तीनच्या सुमारास आणि दुसरी घटना सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. प्राची निलेश तिकोणे (वय 27, रा. आशिष प्लाझा, अभिजीत पार्क, थेरगाव) आणि लिलाधर शरद राणे (वय 36, रा. हिमालया पार्क, संत तुकाराम ब्रीजजवळ, पुनावळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलीसांकडे तपास…
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राची या सोमवारी सकाळी दहा वाजता घराला लॉक लावून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून आतील 3 लाख 26 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. दुसर्‍या घटनेत लिलाधर राणे सकाळी आठ वाजता काही कामानिमित्त घराबाहेर पडले. काम आटोपल्यानंतर रात्री साडेअकराच्या दरम्यान ते घरी परतले त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत पाहिल्यानंतर घरातील 70 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.