पूर्व वैमनस्यातून प्रकार
वाकड : ’आम्हाला नडतो काय’ असे म्हणत एका टोळक्याने पूर्व वैमनस्यातून रिक्षा चालकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ही घटना 12 ऑक्टोबरला मध्यरात्री वाकड येथील म्हातोबा नगर येथे घडली. स्वप्निल प्रकाश घोडगे (वय 18, रा. म्हतोबानगर, वाकड) असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी शाम पटेकर, योगेश गरड, पप्या खरात, भैय्या पटेकर, रोहित कसबे, सतिश पटेकर याच्यासह आणखी दोघांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा
टोळक्याची जमावावर दहशत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्निल 12 ऑक्टोबरला म्हतोबानगर येथे त्याच्या मित्राच्या रिक्षात एकटाच बसला होता. त्यावेळी आलेल्या आरोपी शाम पटेकर याने स्वप्निल याला ‘आम्हाला नडतो काय’ असे म्हणत त्याच्या डाव्या हातावर, सचिन पटेकरने पोटरीवर तर योगेश गरड याने नडगीवर कोयत्याने वार केले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने आरोपींनी नागरिकांना कोयता दाखवून ’कोणी भांडणे सोडवण्यास आले तर जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी देत काही नागरिकांना हाताने मारहाण करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. घोळवे तपास करत आहेत.