जबाबदार अधिकार्यांवर कारवाईची मागणी
पिंपरी : वाकड पोलीस लाईन जवळील टेलिफोन कॉलनीकडे जाणार्या पाण्याच्या पाईपलाईन जवळ एका ठेकेदाराकडून सीमाभिंतीचे काम चालू आहे. त्या कामाच्या दरम्यान पाईप फुटल्याने त्यामधून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. मागील तीन दिवसांपासून हा प्रकार सूरू असून त्याबाबत स्थानिक नागरिकांनी संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना कळविण्यात आले. परंतु, ÷अद्याप 3 दिवस उलटून गेले, तरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकार्यांना जाग आलेली नाही. त्यामुळे कारवाईत कसूर करणार्या पालिकेच्या अधिकार्यांवर कारवाई करा, अशी मागणी अपना वतनचे चिंचवड विभागाध्यक्ष फारुख शेख यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
पाणी गळतीची तक्रार देवूनही दुर्लक्ष…
महाराष्ट्रामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असताना येथे मात्र लाखो लिटर पाणी वाया जात असताना नगरपालिकेच्या अधिकार्यांचे उदास धोरण दिसत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वारंवार पाणीटंचाई जाणवत आहे. परंतु, पालिकेचे अधिकारी अशा प्रकारच्या पाणीगळतीकडे दुर्लक्ष करीत असल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे वाकड परिसरात पाणी गळतीची तक्रार देऊनही दुर्लक्ष करणार्या संबंधित पाणी पुरवठा अधिकार्यांवर तातडीने कारवाई करावी. पाईपलाईन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा. तसेच सीमाभिंतीचे काम करणार्या बेजबाबदार ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी फारुख शेख यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.