पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वाकड परिसरात लिनिअर गार्डन, फुटबाॅल टर्फ ग्राऊंड, व्यायामशाळा आदी विकास कामांचे भूमिपूजन शनिवारी आमदार लक्ष्मण जगताप यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास महापौर राहूल जाधव, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, माजी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, माजी नगरसेवक विनायक गायकवाड उपस्थित होते. वाकड परिसरात नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून शरीर सदृढ व्हावे, याकरिता प्रभागात स्मार्ट डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलासाठी लिनिअर गार्डन आणि मुलांना फुटबॉल ग्राऊंड, तालीम, व्यायामशाळा उभारण्यात येत आहे.
विकासकामांसाठी कोट्यावधींचा निधी…
ममता गायकवाड म्हणाल्या की “वाकड-पिंपळे निलख परिसरात स्मार्ट व्हावा, नागरिकांना मोठ्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरिता कोट्यावधी रुपयाचा निधी खर्चून विकासकामे करण्यात येत आहे. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायी समितीमार्फत अनेक विकास कामे गतवर्षी मंजुर केली होती. त्या कामाची अमंलबजावणी आता होत आहे. वाकड, पिंपळे निलख परिसरात वैभवात भर घालण्यासाठी स्मार्ट डेव्हलपमेंटच्या दृष्टीने विकास कामे करण्यात येत आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे, संकेत चोंधे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पांडकर, पाटील, बशीर आबा, गायकवाड, मुकेकर, भालेकर, शेलार, कोळेकर,पवन भोसले, रमेश दिवेकर, ओव्हाळ, महिला वर्ग उपस्थित होता.