पिंपरी चिंचवड : विवाहितेशी लगट साधून एका तरुणाने तिच्यासोबत संबंध प्रस्तापित केले. तसेच, त्याचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करून हा प्रकार कोणाला सांगितला तर सोशल मीडियावर क्लीप व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार वाकड येथील डांगे चौकाजवळ हॉटेल पायोनियर येथे गुरूवारी (दि. 20) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी, किरण कृष्णा भालेकर (वय 42, रा. सर्वे नं. 44, सोमनाथनगर, वडगाव शेरी, पुणे) याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 30 वर्षीय पीडित विवाहितेने तक्रार दिली आहे.
हे देखील वाचा
साक्षीदार तपासल्यानंतर पुढील कारवाई…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेकरने वाकड येथील डांगे चौकाजवळच्या हॉटेल पायोनियरमध्ये शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पीडित विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर बलात्कार केला. त्याचे मोबाईलद्वारे चित्रीकरण देखील केले. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देखील त्याने विवाहितेला दिली. साक्षीदार तपासल्यानंतर खरी माहिती समोर येईल. आरोपीच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण झाले असेल तर त्याचाही पुरावा म्हणून उपयोग होईल. हे सर्व पुरावे साक्षिदारांसह न्यायालयासमोर सादर केले जातील. त्यानुसार पुढील कारवाई होईल, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक ए. बी. शेटे तपास करत आहेत.