महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या ममता गायकवाड, आरती चोंधे, नगरसदस्य संदिप कस्पटे, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रमोद यादव, अधिक्षक अभियंता अनिल सुर्यवंशी कार्यकारी अभियंता रामदास तांबे, सामाजिक कार्यकर्ते सचिन कलाटे माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.
कावेरी चौकसबवे ते पिंक सिटी कॉर्नेर पर्यंत डी.पी रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणासाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च येणार आहे. विशालनगर, वाघजाई हॉटेल ते कस्पटे चौक पर्यंत सिमेंट कॉक्रींटचा रस्त्यासाठी सुमारे 12 कोटी खर्च येणार आहे. फेब्रुवारी 2021 अखेर काम पूर्ण होणार असून नागरीकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच पाण्याच्या टाकीमुळे पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे.