पिंपरी चिंचवड : बेकायदेशीर विक्रीसाठी घेवून जाणार्या तरुणाला वाकड पोलिसांनी अकरा किलो गांजासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे रोख रक्कमेसह काळ्या बाजारातील 1 लाख 65 हजार 600 रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (दि. 9) सकाळी साडेनऊच्या सुमारास भूमकर चौक रस्त्यावर करण्यात आली. गोपाल संजय माळी (वय 27, रा. हुडकु शिरपूर, ता. शिरपूर, जि. धुळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
हे देखील वाचा
भूमकर चौकात कारवाई…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल हा 11 किलो 42 ग्रॅम गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी शिताफिने भूमकर चौक परिसरात डेअरी फार्म गेट नंबर 2 च्या समोरील बाजुवर गोपालला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता एक लाख 65 हजार 600 रुपये किंमतीचा 11 किलो गांजा आणि 400 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.